बातम्या

अभियानातून संघटनात्मक बांधणीला बळकटी देणार : राजेश क्षीरसागर...

The campaign will strengthen organizational structure


By nisha patil - 7/22/2024 12:44:58 PM
Share This News:



 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात मार्गक्रमण करत असून, शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसैनिक करत आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्वच घटकांना न्याय देण्यात येत आहे. या उल्लेखनीय कार्याचे कौतुक राज्यभरातून होत आहे. आगामी निवडणुका शिवसेना संपूर्ण ताकतीने लढविणार असून, त्याकरिता कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, या महिनाभर शहरात मेळावे, शाखा बांधणी, विभागीय संपर्क कार्यालय उद्घाटने याद्वारे भगवे वादळ घोंगावणार आहे. याकरिता शिवसेनेमार्फत दि. २५ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत "दशमी शिवसंवादाची.. विजयाच्या निश्चयाची" आणि दि.५ ते २० ऑगस्ट पर्यंत "निर्धार शिवसैनिकांचा.. पंधरवडा शिवसंपर्काचा" या अभियानाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष lराजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


अभियानातून संघटनात्मक बांधणीला बळकटी देणार : राजेश क्षीरसागर...