बातम्या

ड्रायव्हरची लायकी काढणाऱ्या कलेक्टरला 24 तासांत पदावरून हटवलं

The collector who disqualified the driver was sacked within 24 hours


By nisha patil - 3/1/2024 2:20:40 PM
Share This News:



ड्रायव्हरची लायकी काढणाऱ्या कलेक्टरला 24 तासांत पदावरून हटवलं

मुंबई : अनेकदा आपल्या हाती अधिकार आले तर तो अधिकारी वा राजकारणी व्यक्ती सर्वसामान्य लोकांना तुच्छ समजून त्याची लायकी काढतात, त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्याची संधीही सोडत नाही. मध्य प्रदेशमधील अशाच एका कलेक्टरने एका ड्रायव्हरला त्याची लायकी विचारली आणि अपमानित केलं. पण हे कृत्य त्या कलेक्टरला चांगलंच महागात पडल्यांच दिसून आलं. शाजापूरचे कलेक्टर किशोर कन्याल  यांना 24 तासांमध्ये पदावरून हटवण्यात आलं आहे. 
   

मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये ड्रायव्हरची लायकी विचारणाऱ्या कलेक्टर किशोर कन्याल यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची स्वत: मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी दखल घेत त्यांना पदावरून हटवले. त्यांना पदावरून हटवण्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः गरिबांचे पुत्र असून हे सरकार गरिबांचे असल्याचे सांगितले. या सरकारमध्ये सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. यासोबतच त्यांनी राज्यातील उर्वरित अधिकाऱ्यांनाही त्यांच्या भाषेवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत


ड्रायव्हरची लायकी काढणाऱ्या कलेक्टरला 24 तासांत पदावरून हटवलं