बातम्या

उत्तूर पंचक्रोशीच्या हरितक्रांतीसाठी नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे योगदान पिढ्यानपिढ्या जनतेच्या हृदयात राहील

The contribution of Namdar Hasan Saheb Mushrif for the Green


By nisha patil - 7/8/2023 7:46:32 PM
Share This News:



ऊत्तूर, दि. ७: आंबेओहोळ प्रकल्प हा या परिसरातील हरितक्रांतीचे मंदिर आहे. स्वर्गीय आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी या प्रकल्पाचा पाया रचला आणि तो पूर्णत्वाला नेऊन त्यावर कळस बांधण्याचे काम नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नवीदसाहेब मुश्रीफ यांनी केले. नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी या पंचक्रोशीच्या हरितक्रांतीसाठी दिलेले योगदान पिढ्यानपिढ्या जनतेच्या हृदयात राहील. जनता हे कसे विसरेल, असेही ते म्हणाले.
         
आंबेओहळ प्रकल्पाच्या पाणीपूजन कार्यक्रमात श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नवीदसाहेब मुश्रीफ यांच्यासह पंचक्रोशीतील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाच्या जलाशयामध्ये फुले अर्पण करून पाण्याचे पूजन झाले.
         
यावेळी श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, १९९९ साली स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी या प्रकल्पाचे पायापूजन केले होते. त्यानंतर अलीकडची १५ वर्षे नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांना या परिसराचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी जनतेने दिली. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आणि शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी शेकडो बैठका घेतल्या व प्रकल्प पूर्णत्वाला नेला.
            
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्याकडे काही कालावधीसाठी जलसंपदा मंत्रीपद आले होते. त्या काळात त्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भरभक्कम मोबदला पॅकेज मंजूर करून आणले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या धरणाचे काम पूर्णत्वाला गेले आणि पाणी अडवून जलपूजनही झाले. नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अथक प्रयत्नातून आणि या परिसरातील भूमिपुत्रांच्या त्यागातूनच हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला आहे. या प्रकल्पामुळे या पंचक्रोशीत हरितक्रांतीच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत. हरितक्रांतीसह या परिसरातील माता-भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी होणारा त्रासही कायमस्वरूपी वाचला आहे.
          
स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात माजी जिल्हा परिषद  सदस्य व आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव धुरे म्हणाले, आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्नातूनच आंबेओहळ प्रकल्प पूर्णत्वाला आला आहे. यामध्ये अन्य कुणाचीही चौथाई नाही.
        
यावेळी माजी उपसभापती शिरीष देसाई ,माजी संचालक मारुतराव घोरपडे, आजरा संघाचे उपाध्यक्ष गणपत सांगले, उत्तूरचे सरपंच किरण आमनगी, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, बहिरेवाडचे माजी सरपंच प्रल्हाद सावंत, आर्दाळचे माजी सरपंच विजय वांगणेकर, राजु चव्हाण, बबन पाटील, रामदास आजगेकर, अभिजीत आजगेकर, मडिलगेचे माजी सरपंच दिपक देसाई, बापू निऊंगरे, राजू चव्हाण, भादवणचे माजी सरपंच संजय गाडे, बी. टी. जाधव, उत्तूरचे सुजित लोखंडे, भैरु सावंत, गंगाधर हराळे, ह. भ. प.  श्रीमती मुक्ताबाई मिसाळ, शरद पाटील, सुधीर सावंत आदी प्रमुख होते.


उत्तूर पंचक्रोशीच्या हरितक्रांतीसाठी नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे योगदान पिढ्यानपिढ्या जनतेच्या हृदयात राहील