पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठ..... आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.......

The contribution of co operation in the development of western Maharashtra is great  Assertion of MLA Hasan Mushrif


By Administrator - 5/30/2023 7:49:01 PM
Share This News:



पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळीचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र  विविध क्षेत्रात प्रगतिशील आणि सक्षम झाला आहे.  महाराष्ट्राच्या विकासात पश्चिम महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील सक्षम सहकार चळवळ राज्याला मार्गदर्शक ठरेल. असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
      येथील शाहू वाचन मंदिरात कागल तालुका देखरेख सहकारी संस्था नूतनीकरण व सहकार भवन उद्घाटन शुभारंभा प्रसंगी आ.मश्रीफ बोलत होते.
मुश्रीफ पुढे म्हणाले सहकार चळवळीचा पाया कागल तालुक्यात घट्ट झाला आहे. सहकारातील विविध संस्था कार्यक्षम असतील तर सहकारात लक्षवेधी काम होणार आहे. सहकार चळवळ स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे. असा विश्वास व्यक्त करत
जिल्हा  बँक सक्षम असेल तर सोसायटी सक्षम होतील. राजकारणात मला आमदार मंत्री होण्यासाठी सहकाराचा मोठा अनुभव मिळाला. सेवा सोसायटी या सहकाराची जननी आहे. त्यामुळे विकास सेवा संस्था गटसचिव आणि जिल्हा बँक या सहकारातील सर्वच संस्थां बद्दल  माझ्या मनामध्ये अभिमान आणि आदराची भावना आहे.पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळीचे जाळे निर्माण झाले आहे. सहकारामुळे विविध क्षेत्रे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्र  प्रगतिशील आणि सक्षम झाला आहे. शेतकरी ही सक्षम होत आहे.  त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळ राज्याला मार्गदर्शक ठरेल.
     भैय्या माने म्हणाले.  राज्यात सहकाराचे जाळे निर्माण झाले आहे. कागल तालुक्यालाही सहकाराची मोठी परंपरा आहे. तालुक्यात सहकाराच्या पाया प्रगल्भ आहे. सर्वांच्या सहकार्यातून सहकार भवन ही सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. असे त्यांनी सांगितले.
      यावेळी राज्य सचिव संघटनेचे सदस्य कुंडलिक खोडवे, ए एम चोपडे यांनी मनोगत व्यक्त केले.
      स्वागत सचिव संघटनेचे युवराज पाटील यांनी केले. तर आभार कृष्णात पाटील यांनी मानले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास गोकुळचे संचालक युवराज(बापू) पाटील, श्रीनाथ उद्योग समूहाचे चंद्रकांत गवळी, बाजार समितीचे संचालक श्री. बी.जी पाटील श्री.नाना कांबळे श्री.सूर्यकांत पाटील केशव पाटील, जीवन शिंदे, दत्ता पाटील, , एम आर चौगुले, उत्तम कांबळे. प्रशांत घाटगे, यांच्यासह सहकारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व गटसचिव, कार्यकर्ते उपस्थित होते.  
 मा. काकडे साहेब (विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विभाग कोल्हापूर )मा.करे साहेब (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर) यांनी इमारतीला सदिच्छा भेट दिली

कागल तालुका देखरेख सहकारी संस्था नूतनीकरण व सहकार भवन उद्घाटन शुभारंभा प्रसंगी बोलताना आ.मश्रीफ बोलत होते. व्यासपीठावर युवराज (बापू) पाटील,भैय्या माने, एस एस पाटील (सहाय्यक निबंधक सह. संस्था कागल.) श्री.एस बी खामकर (अवसायक कागल तालुका देखरेख संघ )चंद्रकांत गवळी, व इतर मान्यवर.


पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठ..... आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.......