बातम्या
शिवाजी विद्यापीठाचा १७ जानेवारीस होणार दीक्षान्त समारंभ
By nisha patil - 8/1/2025 6:28:55 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाचा १७ जानेवारीस होणार दीक्षान्त समारंभ
शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ येत्या शुक्रवारी
शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ येत्या शुक्रवारी होणार आहे. या दीक्षान्त समारंभासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात पीएच. डी. सह इतर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. विद्यापीठाकडून दीक्षांत समारंभाची तयारी देखील सुरू झालीय.
Vo - शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ येत्या शुक्रवारी होणार आहे. दीक्षान्त समारंभासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. याप्रसंगी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. समारंभात पीएच. डी. सह इतर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. विद्यापीठाकडून दीक्षांत समारंभाची तयारी देखील सुरू झालीय. त्यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी unishivaji. ac. in या संकेतस्थळावर माहिती देण्यात आलीय.
शिवाजी विद्यापीठाचा १७ जानेवारीस होणार दीक्षान्त समारंभ
|