बातम्या

हातकणंगले मतदारसंघातील विजयाचे श्रेय मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचेच : श्री.राजेश क्षीरसागर

The credit of the victory in Hatkanangle Constituency belongs


By nisha patil - 4/6/2024 10:25:06 PM
Share This News:



लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीस अनेकांकडून विरोध करण्यात आला. परंतु, शिवसैनिकांना न्याय देण्याची भूमिका जोपासणाऱ्या मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली. सत्यजित पाटील सरूडकर यांच्या उमेदवारीने भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला पण, या मतदारसंघातील आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, महाडिक गट यांच्यासह महायुतीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकजूट घडवून शिवधनुष्य पेलण्याची कसब मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीतून दिसून आली. अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य करण्याचे काम मुख्यमंत्री ना.मा.श्री.शिंदे साहेबांनी केले आहे. कार्यकर्त्याला संधी देवून निवडणून आणण्यासाठी कशापद्धतीने काम केले जाते, ताकद दिली जाते याचे उत्तम उदाहरण मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी दाखवून दिले आहे. याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने मी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार मानतो.

            सद्यस्थितीत ठाकरे गट कोल्हापुरातून हद्दपार झाला असल्याचे पहावयास मिळत असून, कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिल्याचे खासदार धैर्यशील माने यांच्या विजयातून दिसून येते. खासदार धैर्यशील माने यांचे अभिनंदन करतो.

प्रा.संजय मंडलिक यांचा पराभव आम्हास आत्मचिंतन करायला लावणारा असून, आगामी काळात या दोन्ही मतदारसंघासह विधानसभा मतदारसंघांमध्येही जनहिताचे काम करून दोन्ही मतदारसंघांसह आगामी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा सर्वच निवडणुका ताकदीने लढवून जिंकून दाखवू, अशी प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.


हातकणंगले मतदारसंघातील विजयाचे श्रेय मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचेच : श्री.राजेश क्षीरसागर