बातम्या

शिक्षक भरतीची तारीख अखेर निश्चित

The date of teacher recruitment is finally fixed


By nisha patil - 8/28/2023 6:54:02 PM
Share This News:



शिक्षक भरतीची तारीख अखेर निश्चित

पहिल्या टप्प्यात 23 हजार शिक्षकांची भरती होणार 

 शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
 

सहा वर्षापासून रखडलेल्या शिक्षक भरतीची तारिख अखेर ठरली आहे. ५ सप्टेंबर पूर्वी राज्यातील शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल उघडले जाणार असून राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये 23 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यासाठी दहा जिल्हा परिषदांच्या शिक्षक विभागाची बिंदू नामावली अंतिम झाली आहे. तसेच उर्वरित जिल्हा परिषदांना बिंदू नामावली तत्काळ मागासवर्गीय कक्षाला पाठवण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले आहेत. 

              

अनेक जिल्ह्यात ओपन आरक्षण शिल्लक राहिले नसल्यामुळे त्याची चौकशी करून आरक्षणा नुसार कुठल्या आरक्षणातून  कुठला शिक्षक कुठे घेतला याची खात्री करून आरक्षण टाकल जाणार असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी  माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.


शिक्षक भरतीची तारीख अखेर निश्चित