बातम्या
प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राची कन्या करणार पुष्पवृष्टी
By nisha patil - 1/23/2025 6:00:37 PM
Share This News:
प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणुन कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त कमिशनर असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे. वर्ष 2019 मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनी अश्वारोहन, कराटे, योगा, रायफल शूटिंग, तसेच खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवली आहे. ती कराटेमध्ये ब्लॅक बेल्टची सुवर्णपदक विजेती आहे.
प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राची कन्या करणार पुष्पवृष्टी
|