बातम्या

कणेरी च्या हौसाआईच्या निधनाने कणेरी परिसर पोरखा!

The death of the Hausa mother of Kaneri


By nisha patil - 11/5/2024 2:53:07 PM
Share This News:



पन्हाळा ; प्रतिनिधी कणेरी तालुका पन्हाळा येथील तुळसाबाई सर्जेराव पाटील वय ७६ यांचे निधन झाले.  मुळच्या नणुंद्रे येथील पाटील कुटुंबातील  तुळसाबाई यांचा कणेरी येथील सर्जेराव पाटील यांच्याशी विवाह झाला. त्या घरकाम करत असताना आपलाही आपल्या कुटुंबाला हातबार लागवा म्हणून त्यांच्या अंगी असलेल्या चविष्ट स्वयंपाकचा त्या उपयोग म्हणून गरजूंना जेवण बनविण्यासाठी करत होत्या. हळूहळू त्या मोठी जेवणाची आँर्डर घेऊन जेवण बणवू लागल्या.दिवसेंदिवस त्यांच्या जेवणाची खात्यी वाढत गेली. त्यांनी काही कालावधीत हाँटेल व्यवसाय सुरु केला होता. येथेही जेवणासाठी गर्दी होत असे.
 

गेल्या आठवड्यात थोडी तब्येत बरी नसल्याने कोल्हापूरात खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते. शुक्रवारी अक्षय तूत्तीया च्या साडेतीन मुहूर्तावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ही बातमी कणेरी  बांधारी परिसरात  अनेकांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या पश्चात पती,  एक मुलगी, तीन नातवंडे असा परिवार आहे. त्या सिद्धेश्वर सेवा संस्थेचे संस्थापक चेअरमन सोनल दळवी यांच्या आजी होत. रक्षाविसर्जन  रविवार दिनांक १२ रोजी सकाळी नऊ वाजता कणेरी येथे आहे.


कणेरी च्या हौसाआईच्या निधनाने कणेरी परिसर पोरखा!