बातम्या
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीचा अखेर मृत्यू
By nisha patil - 10/21/2023 4:04:11 PM
Share This News:
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीचा अखेर मृत्यू
सांगरुळ मधील विषारी औषध प्राशन केलेल्या विद्यार्थ्यींनीचा अखेर उपाचारा दरम्यान मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरुळ इथल्या विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू झालाय..आर्या सागर खाडे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीच नाव असून गेल्या दहा दिवसापूर्वी तिनं विषारी औषध प्राशन केलं होतं..दरम्यान विषारी औषध प्राशन करण्यामागच कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झालीय..
आर्या खाडे या शालेय विद्यार्थ्यींनीनं दहा दिवसांपूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी अभ्यास करताना विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली होती..थोड्या वेळानं तिला त्रास जाणवू लागल्यानंतर तिला उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं..मात्र शुक्रवारी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाल्याच समोर आलय..दरम्यान आर्याचा मृत्यू झाल्याचं समजताच तिच्या मैत्रिणीना धक्काच बसला.. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीय.
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीचा अखेर मृत्यू
|