तीन कोटी, ६५ लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटनसोहळा उत्साहात संपन्न

The dedication and inauguration ceremony of development works worth 3 crores 65 lakhs was completed with enthusiasm


By nisha patil - 5/27/2023 2:25:55 PM
Share This News:



उंदरवाडी ता. कागल हे गाव कागल तालुक्याच्या पश्चिमेच्या टोकाचे शेवटचे गाव. भौगोलिकदृष्ट्या भुदरगड आणि राधानगरीशीच या गावाची समीपता. विकासापासून वंचित असलेल्या या गावाला नियोजनपूर्वक विकासातून उंदरवाडीचे सुंदरवाडी केले, अशी भावना आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
     गावामध्ये एक कोटीच्या जलजीवन योजनेसह रस्ते व गटर्स, स्मशानभूमी तटबंदी, अंगणवाडी इमारत, व्यायामशाळ,  मराठी शाळा तटबंदी, सौरऊर्जा हाय मॅक्स अशा तीन कोटी, ६५ लाख निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन आमदार श्री. मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ठाकरे गट जिल्हा उपाध्यक्ष महादेवनाना गौड उपस्थित होते.*
            आमदार श्मुश्रीफ पुढे म्हणाले, सुरुवातीला केडीसीसी बँक, पंचायत समितीचे सदस्यपद, नंतर सभापती पद, पुढे राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री या माध्यमातून मी जनतेच्या घरा-दारापर्यंत पोहोचलेला कार्यकर्ता आहे.*
             शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष महादेवनाना गौड म्हणाले, सकाळी साडेपाच- सहापासून रात्री उशिरापर्यंत जनतेची गाऱ्हाणी ऐकणारे आणि सोडवणारे आमदार हसन मुश्रीफ हे राज्यातीलच न्हवे देशातील एकमेव आमदार आहेत.*     
    युवा नेते दिग्विजयसिंह उर्फ भैय्या पाटील- मुरगुडकर म्हणाले, एखाद्या दुर्धर आजाराने दवाखाना पाठी लागला की घर मोडकळीस येते आणि संसार उध्वस्त होतो. रुग्णसेवेच्या माध्यमातून आमदार श्री. मुश्रीफसाहेब यांनी उद्ध्वस्त होणारी हजारो घरे आणि संसार सावरले *येथील कु. माधुरी शामराव पाटील यांची पोस्ट विभागामध्ये अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.   
             यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिलाध्यक्षा सौ. शितल फराकटे, दिग्विजयसिंह उर्फ भैया पाटील, दत्ता पाटील, अशोक कुदळे आदींची मनोगते झाली.*
   आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, गोरगरीब सामान्य माणसांची सेवा आयुष्यभर करीत आलो आहे. या जनतेशी माझी नाळ घट्ट जुळलेली आहे. या जनतेच्या आशीर्वादाची कवचकुंडले जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत कुणीही आमदारकिची स्वप्न बघू नयेत, असेही ते म्हणाले.
  व्यासपीठावर गणपतराव फराकटे, महादेवनाना गौड, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे,  राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, बाजार समितीचे संचालक नानासाहेब कांबळे, बाळासाहेब तुरंबे,  शिवाजीराव पाटील, सरपंच सौ. अनिता पाटील, उपसरपंच सौ. गीताताई बोडके, दिनकरराव पाटील, मारुती पाटील, दत्ता पाटील, पांडुरंग पाटील, जगदीश पाटील, जयदीप पोवार, नारायण पाटील, नंदकुमार पाटील -कौलगेकर, के. के. फराकटे, देवानंद पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
         *स्वागत विठ्ठल पाटील यांनी केले. प्रास्ताविक नेताजी कांबळे यांनी केले
*उंदरवाडी ता. कागल येथील जाहीर सभेमध्ये बोलताना आमदार हसन मुश्रीफ. यावेळी व्यासपीठावर गणपतराव फराकटे, महादेवनाना गौड, मनोजभाऊ फराकटे, सौ. शितल फराकटे, सरपंच सौ. अनिता पाटील, उपसरपंच सौ. गीताताई बोडके व इतर प्रमुख उपस्थित होते.


तीन कोटी, ६५ लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटनसोहळा उत्साहात संपन्नspeednewslive24#