बातम्या

मित्राची अघोरी इच्छा, झोपेतच दगडाने ठेचून केली हत्या

The desperate desire of a friend killed by crushing a stone in his sleep


By nisha patil - 5/8/2023 6:04:03 PM
Share This News:



पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात मित्राकडे अघोरी इच्छा व्यक्त केल्याने, संतापलेल्या मित्राने त्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात भीम ज्योती मंडळ संजय गांधी नगर येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेतील इस्तियाक खान असे मृत तरुणाचे नाव आहे. इस्तियाक आणि राहुल लोहार हे दोघे मित्र गुरुवारी रात्री मोशी परिसरामध्ये दारू पार्टी करत होते.या पार्टीदरम्यान दोघांमध्येही मोठा वाद झाला. इस्तीयाक खान याने राहुल लोहार याला मला तुझं रक्त प्यायचं आहे. अशी अघोरी मागणी केली होती. या मागणीसाठी इस्तीयाक खान याने राहुल लोहारच्या मानेला आपल्या दातांनी चावा देखील घेतला होता. याचाच बदला घेण्याच्या हेतुने राहुल लोहारने झोपलेल्या अवस्थेत असलेल्या इस्तीयाक खानच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे.


मित्राची अघोरी इच्छा, झोपेतच दगडाने ठेचून केली हत्या