बातम्या

व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमधील वादाने घेतलं वेगळच वळण

The dispute between the two took a different turn from a professional competition


By nisha patil - 5/15/2024 5:56:37 PM
Share This News:



पिंपरी- चिंचवड  शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. शहरामधील चिखली परिसरात व्यवसायिक स्पर्धेतून एका व्यवसायिकाने थेट दुसऱ्या व्यवसायिकवर गोळ्या झाडल्या. या घटनेत व्यावसायिक अजय सुनील फुले हा जखमी झाला. पोलिसांनी गोळीबार प्रकरणात हर्षल सोनवणेला अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलसह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे
 

यामध्येअजय सुनील फुले हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी अजय आणि हर्षल यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायिक स्पर्धेतून वाद सुरू होते. या वादातून हर्षल सोनवणेनं दोन मित्रांच्या मदतीने कट रचून अजय फुलेवर गोळीबार केला. सुदैवाने अजय फुले हा बचावला. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत.
 

गोळीबार केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे फरार झाला होता. चिखली पोलीस हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून हर्षलच्या मुसक्या आवळल्या.


व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमधील वादाने घेतलं वेगळच वळण