बातम्या

पुण्यातील डॉक्टर तरुणांना लावत होता इसिसच्या नादाला!

The doctor in Pune was making the youth listen to ISIS


By nisha patil - 7/28/2023 5:36:45 PM
Share This News:



 केंद्रीय दहशतवाद विरोधी तपास यंत्रणा असलेल्या एनआयएने पुण्यातून एका डॉक्टरला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. एनआयएने दहशतवादविरोधी कृत्य केल्याच्या आरोपाखाली या डॉक्टरला अटक केली असून, हा डॉक्टर तरुणांना इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करण्यासाठी मनं वळवत असल्याचा दावा केला गेला आहे.
इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं इसिसशी संबंधित एका डॉक्टरला अटक केली. पुण्यातील कोंढवा भागातून ही अटक करण्यात आली असून, डॉ. अदनानली सरकार (वय 43) असे या व्यक्तीचे नाव आहे. एनआयएकडून करण्यात आलेल्या कारवाईतील ही पाचवी अटक आहे.समोर आलेल्या माहितीनुसार अदनानली सरकार याच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि इसिसशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. डॉ. सरकार हा तरुणांची मनं वळवून या संघटनेसाठी भरत करत असल्याचे या कागदपत्रांतून आढळून आल्याचा दावा एनआयएने केला आहे.एनआयएकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, डॉ. सरकार हा देशात अशांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुण्यातून एका अभियंत्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली गेली होती.
3 जुलै रोजी एनआयएने मुंबईतून चार जणांना अटक केली होती. तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा आणि ठाण्याच्या शरजील शेख, झुल्फिकार अली बडोदावाला अशी मुंबईतून अटक केलेल्यांची नावे आहेत.


पुण्यातील डॉक्टर तरुणांना लावत होता इसिसच्या नादाला!