बातम्या
ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले अन बस थेट झाडावर आदळली
By nisha patil - 5/12/2023 11:02:10 PM
Share This News:
पुण्यातील वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळतआहे. जखमी विद्यार्थ्यांवरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात झालेल्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावावर व्हायरल होत आहे ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं या व्हायरल व्हिडीओतून स्पष्ट होतंय.
सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बसवरती आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले अन बस थेट झाडावर आदळली
|