बातम्या

बाप्पाच्या निरोपाला संपूर्ण गाव एकवटलं

The entire village gathered to bid farewell to Bappa


By nisha patil - 9/29/2023 5:17:30 PM
Share This News:



सावर्डे दुमाला या गावात असणारे गट तट पक्ष गल्लो-गल्ली असणारी मंडळी त्यांच्यात असणारी ईर्षा या सर्वांना फाटा देत जय शिवराय तालीम मंडळाच्या संकल्पनेतून गणेशत्सवास सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत गेली 29 वर्षांची ही परंपरा या गावाने जपलीय.

          गणेश आगमनापासून ते गणेश विसर्जन पर्यंत संपूर्ण गाव एकत्र येऊन या सार्वजनिक गणपतीची आरती करतात तसेच दरवर्षी भजन, पथक धनगरी ढोल, मर्दानी खेळ, अशा विविध वाद्यांचा वापर करत डॉल्बी साऊंड सिस्टिम ला फाटा देऊन पारंपरिक रीतीने  गणेशोत्सव साजरा करण्यात येतो या वर्षी ही अनंत चतुर्थीला बाप्पाला निरोप देण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ जमले होते .जय शिवराम तालीम मंडळाने भव्य  मिरवणूक काढली होती हि मिरवणूक तब्बल ५ तास चालली त्यानंतर महा आरती झाली  

  यावेळी जय शिवराम तालीम मंडळाचे अध्यक्ष सागर निकम, गणेश मूर्ती देयक एकनाथ खाडे ,रघुनाथ भोसले , सावर्डे दुमाल गावचे सरपंच भगवान रोटे, उपसरपंच प्रकाश कदम, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक शिवाजी वाडकर, गणेश निकम ,प्रकाश कांबळे , सर्व संस्थेचे पदाधिकारी, विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते व सर्व संस्थेचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बाप्पाच्या निरोपाला संपूर्ण गाव एकवटलं