बातम्या

31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम, सरकारचा मोठा निर्णय

The export ban on onions will continue even after March 31


By nisha patil - 3/23/2024 4:47:15 PM
Share This News:



सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे. ही बंदी 31 मार्चपर्यंत असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, आता 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह  विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बोले तैसा न चाले अशाच प्रकारचं हे सरकार असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे परित्रक सरकारच्या वतीन काढण्यात आलं आहे. पुढील आदेश निघपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी केली होती. ती 31 मार्चला उठेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, केंद्र सरकारनं पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.


केंद्र सरकारनं 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घालण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी ही निर्यातबंदी 31 मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. त्यामुळं 31 मार्चनंतर तरी सरकार कांद्यावरील निर्यातबंदी उठवेल अशी अपेक्षा देशासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होती. मात्र, तसे काही झाले नाही. 31 मार्चनंतर देखील कांद्याच्या निर्यातीवरील बंदी कायम ठेवणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळं विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी देखील आक्रमक झालेत. सरकारनं तातडीनं त्यांचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरुपाचं आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. 
 

केंद्र सरकार सध्या महागाई नियंत्रणात आणण्यासाठी विविध धोरणं आखत आहे. यातीलच एक धोरण म्हणजे कांद्यावरील निर्यातबंदी आहे. कांद्याच्या किंमती वाढू नये. सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. कारण सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्यासाठी सरकार असे निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, दुसऱ्या बाजूल सरकारच्या या निर्णयामुळं देशातील शेतकरी मात्र संतप्त होत आहे. कारण कांद्यावर निर्यातबंदी केल्यामुळं दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं तातडीनं निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करतायेत.


31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम, सरकारचा मोठा निर्णय