बातम्या
साखरेवरील निर्यात बंदी यापुढेही कायम राहणार
By nisha patil - 10/19/2023 3:44:29 PM
Share This News:
साखरेवरील निर्यात बंदी यापुढेही कायम राहणार th
31 ऑक्टोंबर नंतर ही देशात साखरेच्या निर्यातीवर बंदी राहणार
आता आम जनतेला स्वस्त दरात साखर उपलब्ध होईल
सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढत चालल्यामुळे त्याला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी यापुढेही कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. 31 ऑक्टोंबर 2023 नंतर ही देशात साखरेच्या निर्यातीवर बंदी राहणार आहे.यामुळे साखरेचे दर नियंत्रणात राहून आम जनतेला स्वस्त दरात साखर उपलब्ध होईल. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याबाबत विदेश व्यापार महा निदेशालय म्हणजेच डीजीएफटी ने अधिसूचना जारी केली आहे युरोपियन युनियन आणि अमेरिका यांना या बंदीतून वगळण्यात आले आहे इतर सर्व गोष्टी आणि नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असेही अधिसूचनेत म्हणले आहे यापूर्वी सरकारने एक जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत साखरेचा निर्यातीवर बंदी घातली होती आता पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी 31 ऑक्टोबर नंतरही लागू राहणार आहे.
साखरेवरील निर्यात बंदी यापुढेही कायम राहणार
|