बातम्या

७० व्या पुरस्काराने कारखान्याचा राष्ट्रीय व राज्य पातळीवर गौरव

The factory was honored at the national and state level with the 70th award


By nisha patil - 8/16/2024 1:09:09 PM
Share This News:



कागल,प्रतिनिधी. येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास  नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत गळीत हंगाम २०२२-२०२३ साठी जाहीर झालेला ' अति उत्कृष्ट साखर कारखाना' हा देश पातळीवरील पुरस्कार कारखान्यास दिल्ली येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री
अमित भाई शहा यांच्या शुभ हस्ते  शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

कारखान्याच्या वतीने  शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री  विरकुमार पाटील यांनी तो स्वीकारला. यावेळी
मा. कृष्ण पाल, राज्य मंत्री (सहकार)मा. चौधरी लक्ष्मी नारायण सिंह,गन्ना विकास मंत्री उत्तर प्रदेश
मा. हर्षवर्धन पाटील
 अध्यक्ष, नॅशनल शुगर फेडरेशन न्यू दिल्ली  ⁠मा ईश्वरभाई पटेल
माजी सहकार मंत्री ,गुजरात राज्य यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखान्याच्या वतीने उपाध्यक्ष अमरसिंह  घोरपडे, यांच्यासह, सहकारी संचालक,  कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

शाहू कारखान्यास मिळालेला हा सत्तरावा पुरस्कार असून  शाहू  ने  आपल्या  व्यवस्थापकीय व प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर पारितोषिक मिळवण्याची परंपरा अखंडित ठेवली आहे.
 

  .... सभासदांचे सततचे, सहकार्य,अधिकारी कर्मचारी यांच्या कष्टाचे फलित 

 शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  म्हणाले, कारखान्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे, सभासदांचे सततचे, सहकार्य व अधिकारी-कर्मचारी  यांच्या कष्टाची जोड, याचे फलित आहे. लोक कल्याणकारी राजे  छत्रपती शाहू महाराज यांना आदर्श मानून स्व. राजेसाहेब यांनी हा कारखाना चालवला. शाहू महाराजांच्या 150 व्या जयंती वर्षात कारखान्याचा झालेला हा मोठा सन्मान म्हणजे त्यांना प्रत्यक्ष कृतीतून केलेले अभिवादन आहे.


७० व्या पुरस्काराने कारखान्याचा राष्ट्रीय व राज्य पातळीवर गौरव