बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्यानं कंगनाची उडवली खिल्ली

The famous actor mocked Kangana


By nisha patil - 8/5/2024 5:52:10 PM
Share This News:



सुप्रसिद्ध आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आहे तीने राजकारणात प्रवेश केला आहे. ती मंडीतुन निवडणूक लढवणार असून सध्या जोरदार प्रचार करत आहे. कंगना अनेक ठिकाणी सभा घेत आहे. पण नुकताच कंगनाने एका रॅलीत केलेल्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली. कंगनाने स्वतःची तुलना बॉलिवूडच्या शहेनशाह अमिताभ बच्चनशी केली आहे. यानंतर तिच्यावर खूप टीका झाली आणि तिची खिल्ली उडवली गेली.

आता कंगनाच्या या वक्तव्यावर एका प्रसिद्ध अभिनेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे. या अभिनेत्यानं कंगनाची तुलना राखी सावंतशी केली आहे.कंगनावर अभिनेता कमाल आर खानने टीका केली आहे. बॉलिवूड अभिनेता कमाल राशिद खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो. तो अनेक बॉलिवूड अभिनेत्यांवर टीका करताना दिसून येतो.आता केआरकेने कंगनाची या वक्तव्यावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडिओत तो म्हणाला, ‘कंगना दीदी निवडणूक लढवतेय. रोज कुठे ना कुठे काहीतरी वक्तव्य करत असते. ते ऐकून खूप हसू येतं. पण नुकतंच तिने असं काही बोलली की जे ऐकून मी खळखळून हसलो.

‘अमिताभ बच्चन यांच्यानंतर मीच…’ हे चुकीचं बोललीस तू कंगना.’तो पुढे म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये ज्यांना सर्वात जास्त सन्मान मिळतो त्यात तू नंबर एक वर आहेस, दोनवर नाही. या यादीत तुझ्यानंतर २ नंबरला राखी सावंत तर तिसऱ्या नंबरला उर्फी जावेद आहे. तर चौथ्या नंबरला आहे शर्लिन चोप्रा. यानंतर कुठे दुसऱ्या कोणाचा नंबर येतो.’ असं म्हणत केआरकेने कंगनावर निशाणा साधला आहे.


प्रसिद्ध अभिनेत्यानं कंगनाची उडवली खिल्ली