बातम्या
शेतकऱ्याच्या ऊसाला सध्या कोल्हा लागला आहे
By nisha patil - 6/2/2024 3:38:40 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचे विक्रमी पिक घेतले जात आहे. पण दिवसेंदिवस शेतकर्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
शेतकऱ्याला हुकमी पैसा मिळवून देणारे पीक म्हणजे "ऊस" या उसाला सध्या तोडणी येण्यासाठी शेतकऱ्याला गल्लीतील ऊस तोडकर्या पासून ते कारखान्यापर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हात जोडावे लागत आहेत. कारण केलेल्या ऊस रानातून तुटून वेळेत नाही गेला तर उंदीर घूस कोल्हा यांच्यापासून त्याची नासाडी होत आहे. तसेच केलेला ऊस हा ऊस तोडकरी ते कारखान्याचे पदाधिकारी पर्यंत सर्वच त्यांना लुटत आहेत. सध्या एक ट्रॉली ऊस बाहेर काढण्यासाठी एक हजार रुपये मोजावे लागतात. दोन टाईम नाश्ता, चहापाणी, प्रोग्राम आधी दिल्यानंतर एक ट्रॉली ऊस बाहेर काढला जातो. या सर्व कारणामुळे शेतकऱ्याला ऊस करावा की नको अशी अवस्था झाली आहे.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करावी की नको म्हणून सध्या उसाकडे पाठ फिरवू लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे लुटालुटी चे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतकरी राजा तीव्र नाराजीत आहे. तरी संबंधित अधिकारी याकडे लक्ष देतील काय? शेतकऱ्याच्या गळ्याचा पास काढतील काय? असे अनेक प्रश्न सध्या तरी शेतकऱ्यासमोर उभे ठाकले आहेत.
शेतकऱ्याच्या ऊसाला सध्या कोल्हा लागला आहे
|