बातम्या
शेतकऱ्याकडे ऊस तोडण्यासाठी मागितलेली खुशाली परत द्यावयास लावली .
By nisha patil - 1/28/2025 9:48:55 PM
Share This News:
शेतकऱ्याकडे ऊस तोडण्यासाठी मागितलेली खुशाली परत द्यावयास लावली .
पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांनी ऊस तोडण्यासाठी रशीद मुल्ला या शेतकऱ्याकडे पैशाची मागणी केली तसेच टोळी एक किलोमीटर वरून आणण्यासाठी टेम्पो ची मागणी केली होती त्या शेतकऱ्याने त्या मुकादम त्याच्या मागणीप्रमाणे पैसे दिले तरी सुद्धा त्याचा एक खेप रानात ठेवून अजून पैशाची मागणी त्याच्याकडे करत होते.
.%5B1%5D.jpg)
त्याबद्दल त्या शेतकऱ्याने आंदोलन अंकुश संघटनेकडे आज तक्रार दिली होती त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन साखर सहसंचालक ऑफिसने संबंधित शेतकऱ्याचे पैसे परत द्यावे असे आदेश कारखान्याला दिले त्या अनुषंगाने पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी कुरुंदवाड विभागाचे व शेअर स्लिप बॉय यांनी संबंधी शेतकऱ्यांच्या उसाच्या फडात जाऊन सदर मुकादमाची कान उघडणी करून पैसे परत द्यावयास लावले त्यावेळी आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील शेती अधिकारी प्रशांत चंदोबा ओव्हरसीयर संजय पाटील स्लीप मास्तर मठपती शंकर पाटील तसेच रशीद मुल्ला महावीर पाटील रावसाहेब रायनाडे चंद्रकांत पोतदार इत्यादी शेतकरी उपस्थित होते .
ऊस तोडण्यासाठी भागातील कोणत्याही शेतकऱ्याने खुशाली एन्ट्री देऊ नये तशी मागणी झाल्यास तक्रार करा असे आव्हान आंदोलन अंकुश संघटनेकडून करण्यात येत आहे
शेतकऱ्याकडे ऊस तोडण्यासाठी मागितलेली खुशाली परत द्यावयास लावली .
|