बातम्या

शिंगणापूर येथील शांक भरी देवीचा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा...

The festival of Shankara Devi at Shingnapur is celebrated in a devotional atmosphere


By nisha patil - 1/13/2025 7:54:26 PM
Share This News:



शिंगणापूर येथील शांक भरी देवीचा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा...

अरुंधती महाडिक यांच्या हस्ते महाआरती संपन्न

शिंगणापूर येथे श्री शाकंभरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे. या महोत्सवाच्या सहाव्या दिवशीची महाआरती भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाली.

शिंगणापूर येथील श्री शांत बरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.चार वर्णाची कुलदेवता असणारी  शाकंभरी देवीचा महिमा अगाथ आहे. सर्वांना सुख-समृद्धी, धनसंपदा व निरोगीमय जीवन लाभो, अशी प्रार्थना . महाडिक यांनी देवीचरणी केली. याप्रसंगी उपस्थित माता-भगिनींशी संवाद साधून सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या..यावेळी मा. पिंटू काळे, मा. चेतन साळोखे, मा. पप्पू सावंत, मा. दत्तात्रय आवळे, मा. निलेश सूर्यवंशी, मा. सीमा साळोखे, मा. सुवर्णा आवळे शाकंभरी देवी भक्त मंडळाच्या सर्व महिला आणि पुरुष सदस्य तसेच भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते


शिंगणापूर येथील शांक भरी देवीचा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा...
Total Views: 37