विशेष बातम्या
जोपर्यंत दोषींना बेड्या नाहीत, तोपर्यंत लढा थांबणार नाही!" - रोहन निर्मळ
By nisha patil - 7/4/2025 4:08:55 PM
Share This News:
बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरण...
जोपर्यंत दोषींना बेड्या नाहीत, तोपर्यंत लढा थांबणार नाही!" - रोहन निर्मळ
कागल तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात तुकडा बंदी तुकडा जोड कायद्याच्या विरोधात दस्त नोंद करताना मोठ्या प्रमाणात लाच मागितल्याची गंभीर माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. या प्रकरणात काही स्टॅम्पवेंडरांना हाताशी धरून गैरव्यवहार सुरू असल्याचे जमजताच या प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी तात्काळ तहसीलदार कागल व मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली. त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नसल्याने मनसेच्या वतीने तहसीलदार कार्यालय कागल समोर उपोषण सुरू केले होते,त्यानंतर संबंधित दुय्यम निबंधक गुरव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.*
मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय केवळ बदलीवर थांबवलेला नाही, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ व कागल तालुकाध्यक्ष विनायक आवळे यांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास व्हावा, आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी ठामपणे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या मागणीनुसार संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी समिती नेमण्यात आली.
येत्या दोन दिवसात या चौकशीतील कागदपत्र, व्हिडिओ क्लिपिंग्स व अन्य पुरावे सादर करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर या सर्वांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे.
जोपर्यंत दोषींना बेड्या पडत नाहीत, तोपर्यंत लढा थांबणार नाही!" असे स्पष्ट शब्दात मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले..
जोपर्यंत दोषींना बेड्या नाहीत, तोपर्यंत लढा थांबणार नाही!" - रोहन निर्मळ
|