बातम्या

"या" स्टारच्या पदार्पणाने चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घातला........

The film hit the box office with the debut of the Ya star


By nisha patil - 9/7/2024 6:36:25 PM
Share This News:



बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी झाले आहेत ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले.  या स्टारच्या पदार्पणातील  चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हृतिक हा ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा आहे. हृतिकचा सुरुवातीपासूनच चित्रपट जगताकडे कल होता. बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या हृतिकने 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली.
 

अभिनेत्री अमिषा पटेलनेही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दोघांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आजही या चित्रपटातील गाणी लोकप्रिय आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी केले होते. पहिल्याच चित्रपटापासून हृतिक रातोरात स्टार झाला.'कहो ना प्यार है' हा चित्रपट वर्ष 2000 मधील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. या चित्रपटाने पुरस्काराच्या बाबतीत इतिहास रचला होता. 'कहो ना प्यार है'ने वेगवेगळ्या श्रेणीत 92 पुरस्कार मिळवले होते.


"या" स्टारच्या पदार्पणाने चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घातला........