बातम्या
कचरा प्रक्रिया प्रकल्पाला लागलेली आग आली नियत्रंणात...
By nisha patil - 1/28/2025 7:22:26 PM
Share This News:
कचरा प्रक्रिया प्रकल्पाला लागलेली आग आली नियत्रंणात...
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह केली पाहणी
कसबा बावड्यातील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला गेले दोन-तीन दिवस आग लागली होती. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या फायर फायटर व दोन पाण्याच्या टँकरद्वारे आग आटोक्यात आणण्याचे काम सुरूय. सोमवारी दुपारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केलीय.
यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन कंपाऊंडवर सुरू असलेल्या पत्र्याच्या आडोशाचे काम जे सुरू आहे ते अष्टेकरनगर या ठिकाणी तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच झूम प्रकल्पाबाहेरील रस्त्यावर पडलेला कचरा उठाव करून आत प्रक्रियेसाठी पाठवा. तसेच मटण मार्केटमधील कचरा त्या ठिकाणी उघड्यावर न टाकता विंडो शेडमध्ये प्रक्रिया करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्यात.
यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता रमेश कांबळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार उपस्थित होते.
कचरा प्रक्रिया प्रकल्पाला लागलेली आग आली नियत्रंणात...
|