बातम्या

कोतोलीतील सुवर्णबली पतसंस्थेच्या पहिल्या शाखेचा रविवारी शुभारंभ

The first branch of Suvarnabali Credit Union in Kotoli was inaugurated on Sunday


By nisha patil - 9/2/2024 1:03:44 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : - कोतोली येथील सुवर्णबली पतसंस्थेच्या पहिल्या शाखेचा रविवार दि.११ रोजी कोल्हापूर येथे आम.विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे संस्थापक चेअरमन सज्जन पाटील यांनी सांगितले.
 

यावेळी प्रमुख पाहुणे गोकुळ संचालक कर्णसिंह गायकवाड, गोकुळ संचालक अजित नरके आहेत. तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र समुहाचे  जेष्ठ नेते डी.जी.पाटील,  जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, सहाय्यक निबंधक नारायण परजणे, मा.उपमहापौर महेश सावंत,चेअरमन शाहु पतसंस्था विकास पाटील, अध्यक्ष कोल्हापूर चेंबर संजय शेटे, सरपंच कोतोली वनिता पाटील, अध्यक्ष के.डी.सी.ए.मदन पाटील, संचालक कुंभी साखर सुरेश काटकर, आदीसह संचालक मंडळ व विविध पदाधिकारी ,मान्यवर व मित्रपरिवार उपस्थितीत राहणार आहेत.
 

शाहुपुरी तीसरी गल्ली येथे दुपारी दोन वाजता उदघाटन शुभारंभ सोहळा संपन्न होणार असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जनरल मँनेजर रवी लव्हटे यांनी केले आहे.


कोतोलीतील सुवर्णबली पतसंस्थेच्या पहिल्या शाखेचा रविवारी शुभारंभ