बातम्या
शिवसेनेच्या उमेदवारीचा पहिला मान मलाच; खास. संजय मंडलिक यांना खात्री
By nisha patil - 3/13/2024 11:15:59 PM
Share This News:
प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत खेचाखेची सुरू असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारीचा पहिला मान तुम्हालाच मिळेल असे असा शब्द दिला आहे, असा निर्वाळा खासदार संजय मंडलिक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक यांच्या ऐवजी भाजपकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर गेले तीन दिवस मंडलिक हे मुंबई तळ ठोकून होते. ते आज कोल्हापुरात परतले. यावेळी माध्यमांनी त्यांची भूमिका जाणून घेतली.
मंडलिक म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत सेनेचे ११ खासदार होते. १२ खासदार पूर्ण होण्याची घटनात्मक गरज होती. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने यांनी सोबत येण्याचा आग्रह धरला. तुमच्या सोबत कशासाठी यायचे असा प्रश्न केला तेव्हा हवा तितका निधी दिला जाईल असे आश्वासित केले.
बडे नेते सोबत
पुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली तेव्हाही महायुतीची उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा शब्द दिला होता. आता मुंबई मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी इथे वेळ घालवण्यापेक्षा थेट प्रचाराला लागा अशा सूचना केल्या आहेत. हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, विनय कोरे असे बडे नेते सोबत असल्याने काळजी करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या उमेदवारीचा पहिला मान मलाच; खास. संजय मंडलिक यांना खात्री
|