बातम्या

राज्यातील पहिल्या तीन लाडक्या बहिणी कोल्हापुरातील

The first three lovely sisters in the state are from Kolhapur


By nisha patil - 8/15/2024 6:31:55 PM
Share This News:



कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास बुधवारी सुरुवात झाली. राज्यातील पहिल्या तीन लाभार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील असून, एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. चारही खातेदार यूथ को. ऑप. बँकेचे असून, त्यांच्या खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपयांप्रमाणे पैसे वर्ग झाले आहेत.
 

राज्य सरकारने २१ ते ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. जुलै महिन्यात योजनेला मान्यता देऊन पात्र महिलांकडून अर्ज मागवले होते. महिन्याला १५०० रुपये महिलांना दिले जाणार आहेत. एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातून ६ लाख ८८ हजार ९०१ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. रक्षाबंधनपूर्वी संबंधितांच्या खात्यावर जुलै व ऑगस्ट महिन्याचे, असे मिळून तीन हजार रुपये वर्ग करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या हप्त्याकडे जिल्ह्यातील महिलांच्या नजरा लागल्या होत्या.
 

बुधवारी सायंकाळी यूथ बँकेच्या चार खातेदारांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपयांप्रमाणे वर्ग झाले आहेत. त्यातील तीन महिला कोल्हापुरातील, तर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. विशेष म्हणजे यूथ बँकेने प्रत्येक शाखेत स्वतंत्र व्यवस्था करून तब्बल २० हजार महिलांचे फाॅर्म भरून घेतले हाेते. याशिवाय पीएम किसान, वयोश्री, गॅस अनुदानाचे कामही बँकेच्या माध्यमातून केले आहे.

योजना जाहीर झाल्यानंतर सामान्य कुटुंबातील महिलांसाठी बँकेने सर्वप्रथम शून्य बॅलेन्सवर खाते उघडून घेऊन त्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम बँकेच्या माध्यमातून केले. पैसे जमा होणाऱ्या पहिल्या चार महिला या यूथ बँकेच्या असल्याचा आनंद आहे.


राज्यातील पहिल्या तीन लाडक्या बहिणी कोल्हापुरातील