बातम्या
मित्रांनीच केला घात, फुस लावून रूमवर नेलं आणि....
By nisha patil - 11/9/2023 6:01:55 PM
Share This News:
कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खरं तर या अल्पवयीन मुलीची तिच्याच मित्रांनी छेड काढली होती. ज्यामुळे ती मानसिक तणावात गेली होती.या मानसिक तणावातून तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे. या प्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासोबत राहत होती. शुक्रवारी घरी असताना ती कुणाशीच बोलत नव्हती. तिच्यावर मानसिक तणाव असल्याचे दिसत होते. त्यावेळेस तिच्या भावाने तिची विचारपूस केली असता मुलीने घडलेला सर्व धक्कादायक प्रसंग सांगितला.माझ्यासोबत माझ्या मित्रांनी गैरकृत्य करीत छेडछाड केली आहे. हे ऐकताच भावा लाही धक्का बसला आणि तो घराबाहेर गेला आणि काही वेळाने परतला. तो पर्यंत बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे पाहून त्याला जबर मानसिक धक्का बसला.याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पवार यांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहोत. मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या विरोधात भादवि ३०६ , ३५४, ३४ पोक्सा ८,१२ प्रमाणे चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुलीचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठविला आहे. मुलीसोबत छेडछाड झाली आहे की, तिच्यासोबत आणखी काही गैर प्रकार घडला आहे. हे तिच्या शवविच्छेदन अहवाला पश्चात कळणार आहे. अहवालात काही आढळून आल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
मित्रांनीच केला घात, फुस लावून रूमवर नेलं आणि....
|