बातम्या

भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे भविष्य अतिशय उज्वल

The future of Indian IT industry is very bright


By nisha patil - 12/11/2023 1:41:18 AM
Share This News:



भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे भविष्य अतिशय उज्वल
-'नॅस्कॉम'चे उपाध्यक्ष श्रीकांत श्रीनिवासन यांचे प्रतिपादन 
-डी. वाय. पाटील ग्रुपच्या ‘कॅम्पस कनेक्ट’ मध्ये मार्गदर्शन

कसबा बावडा / वार्ताहर
जगामधील 35 टक्के माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे कामकाज भारतातून होत असून भविष्यातही या क्षेत्राची आणखी वेगवान घोडडौड सुरू राहील अशा विश्वास नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनी अर्थत नॅस्कॉमचे उपाध्यक्ष श्रीकांत श्रीनिवासन यांनी व्यक्त केला.  डी. वाय. पाटील ग्रुपच्या ‘कॅम्पस कनेक्ट’ मध्ये ते  बोलत होते. 

    डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा आणि स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्यावतीने ‘कॅम्पस कनेक्ट’ या सिरीजचे आयोजन करण्यात आले होते. नॅस्कॉमचे उपाध्यक्ष श्रीकांत श्रीनिवासन व वरिष्ठ संचालक चेतन सामंत यांनी यावेळी फॅकल्टी, विद्यार्थी व व्यवस्थापन यांच्याशी संवाद साधला. 

  यावेळी बोलताना  श्रीनिवासन  म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा परिणाम उद्योग जगतावरती नक्कीच होईल. मात्र मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता कोणत्याही प्रकारे रिप्लेस करू शकणार नाही. यामुळे बऱ्याच नोकऱ्यावर परिणाम होईल, मात्र नव्या संधीही निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी नवनवीन स्किल्स आत्मसात करणे आवश्यक आहे. 

    यावेळी त्यांनी माहिती तंत्रज्ञान उद्योगाची सद्यस्थिती विशद केली. त्याचबरोबर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पुढील काळामध्ये काय बदल होणार आहेत आणि त्याची वाटचाल कशा पद्धतीने असेल याबद्दलही त्यानी मार्गदर्शन केले.

   नॅस्कॉमचे उपाध्यक्ष श्रीकांत श्रीनिवासन व वरिष्ठ संचालक डॉ. चेतन सामंत यांनी विद्यार्थ्यांनी भविष्याची चिंता करत बसण्यापेक्षा  वर्तमानावर लक्ष केंद्रित केंद्रित करून  जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करावे. विविध स्कील व तंत्रज्ञाने अवगत करून  भविष्यासाठी स्वतःला तयार करावे.

  नॅस्कॉमचे विभागीय प्रमुख सचिन म्हस्के यांनी नॅस्कॉमचे वेगवेगळे उपक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या कौशल्य विकास योजना यांच्या बद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले.

    डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. गुप्ता यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. डी वाय पाटील ग्रुपमधील विविध संस्थांमध्ये चालवले जाणारे अभ्यासक्रम व  उपक्रमांची त्यानी माहिती दिली. सर्व मान्यवरांनी यावेळी  डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट आणि डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी च्या वेगवेगळ्या प्रयोगशाळेंना भेट देऊन तेथील सुविधांचे कौतुक केले.

    डी वाय पाटील ग्रुपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झालेल्या उच्चस्तरीय परिसंवादामध्ये विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.  माहिती तंत्रज्ञान उद्योगाची सद्यस्थिती, उद्योग जगतामध्ये होत असलेले बदल, येणारे नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगाची पुढची वाटचाल याबद्दल चर्चा केली.  अण्णा युनिव्हर्सिटच्या धर्तीवर प्रोजेक्ट बेस्ड लर्निग आणि सायबर सेक्युरिटी या क्षेत्रात सामंजस्य करारावर चर्चा झाली. यावेळी कुलगुरू डॉ. आर. के.  मुदगल, कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांच्यासह विविध संस्थंचे प्राचार्य व विभागप्रमुख उपस्थित होते. 

   डी. वय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील आणि डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे  प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रा. आश्विन देसाई, प्रा अभिजित मटकर, सिद्धार्थ रातौरी, डॉ. गणेश पाटील, डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ काशीद यांनी केले.

कसबा बावडा : नॅस्कॉमचे उपाध्यक्ष श्रीनिवासन यांचे आमदार ऋतुराज पाटील. समवेत डॉक्टर चेतन सामंत सचिन मस्के डॉ. ए के गुप्ता, डॉ. आर के मुदगल, डॉ. के प्रथापन, डॉ. अजित पाटील, डॉ. संतोष चेडे, डॉ. महादेव नरके, श्रीलेखा साटम, डॉ अभिजीत माने, डॉ. जे. ए.  खोत डॉ सतीश पावसकर आदी


भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे भविष्य अतिशय उज्वल