बातम्या

सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारची मुदत आज संपणार मराठा बांधवांसाठी ३०० क्विंटल जेवणाची सोय

The government's deadline for implementing the guidelines will end today


By nisha patil - 7/13/2024 12:20:07 PM
Share This News:



 मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतर आज  मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅलीचा समारोप करणार आहेत. सगेसोयऱ्यांसह सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आद्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपणार आहे.
   

 मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या छत्रपती संभाजीनगर मधील रॅलीसाठी जयत तयारी करण्यात आली आहे. शहरातील चौकात चहा नाष्ट्याची सोय करण्यात आली असून रॅलीच्या मार्गावर 250 भोंगे, 5 हजार झेंडे तयार करण्यात आले असून शहरात ठिकठिकाणी 800 बॅनर लावण्यात आले असून 13 ठिकाणी स्वागतासाठी कमानी बांधण्यात आल्या आहेत. तसेच एकूण पाच ठिकाणी 10 एलईडी बलून हवेत सोडले जाणार आहेत.
         

 सगेसोयऱ्यांसह सरसकट सर्वांना आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी 13 जुलैपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत आज संपणार असून अध्यादेश दिला तर ओबीसी समाज मुंबई धडकणार असल्याचा इशारा ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे..


सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारची मुदत आज संपणार मराठा बांधवांसाठी ३०० क्विंटल जेवणाची सोय