बातम्या
शासनाने अखर्चित अनुदान खर्च करण्यास मुदतवाढ दिली
By nisha patil - 7/2/2025 12:47:09 PM
Share This News:
शासनाने अखर्चित अनुदान खर्च करण्यास मुदतवाढ दिली
मुंबई : महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महानगरपालिका आणि प्राधिकरणांना वितरीत केलेल्या अनुदानापैकी अद्याप खर्च न झालेल्या निधीसाठी मुदतवाढ दिली आहे. वित्त विभागाच्या नव्या शासन निर्णयानुसार, दि. ३१ मार्च २०२३ पूर्वी वितरीत झालेला व अद्याप अखर्चित असलेला निधी दि. ३० जून २०२५ पर्यंत खर्च करता येईल, मात्र त्यासाठी दि. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत निविदा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
मुदतवाढीचे कारण व अटी
आर्थिक वर्ष संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित राहिल्याचे आढळून आले. यामुळे, शासनाने आधी २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत निधी खर्च करण्यास परवानगी दिली होती. मात्र, अद्याप काही संस्थांनी निधी खर्च न केल्याने त्यांना अंतिम मुदतवाढ दिली आहे.
शासनाचे निर्देश
१. दि. ३० जून २०२५ पर्यंत निधी खर्च न केल्यास, तो दि. ५ जुलै २०२५ पर्यंत शासनाकडे जमा करावा लागेल.
२. निधी वेळेत परत न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा.
3. इतर अंमलबजावणी यंत्रणांनी दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत अखर्चित राहिलेला निधी दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत शासनाकडे परत करावा.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in येथे उपलब्ध आहे
शासनाने अखर्चित अनुदान खर्च करण्यास मुदतवाढ दिली
|