बातम्या

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निघणार महायुतीची महारॅली!

The grand rally of Mahayuti will be launched on the auspicious occasion of Gudi Padwa


By nisha patil - 7/4/2024 10:28:14 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी    कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली असून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ महायुतीच्यावतीने सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कार्यरत झाले आहेत.  
 

याचाच एक भाग म्हणून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व इतर घटक पक्षांच्या नारीशक्तीच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज भाजपा जिल्हा कार्यालयात मोटरसायकल रॅलीचे आयोजना संदर्भात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी व घटक पक्षांच्या प्रमुख महिला पदाधिका-यांची बैठक संपन्न झाली. 
 

मंगळवार दिनांक ०९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गांधी मैदान येथून हि मोटरसायकल रॅली सुरु होऊन शाहजी लॉ कॉलेज नजीक असणाऱ्या महायुतीच्या प्रचार कार्यालया उद्घाटनासाठी हि रॅली पोचणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून महायुतीच्या विजयासाठी स्त्रीशक्ती सज्ज झाली आहे. 
याप्रसंगी उपस्थित महिलांनी नारीशक्तीचा सन्मान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कोल्हापूरात स्त्रीशक्तीचा जागर करणार असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर महायुतीच्या सर्व पक्षातील महिलांमध्ये समन्वय साधून मा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ एकदिलाने काम करण्यार असल्याचे सांगत शहरातील जासतील जास्त महिलांनी या मोटरसायकल रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन भाजपा रुपाराणी निकम, राष्ट्रवादी रेखा आवळे, शिवसेना मंगल साळोखे यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

 

याप्रसंगी शिवानी मंडलिक, पूनम जाधव, गायत्री राउत, संगीता खाडे, माधुरी नकाते, जाहिदा मुजावर, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, धनश्री तोडकर, स्वाती कदम, शीतल तिरूके, शिवानी पाटील, नम्रता भोसले, शरयु भोसले, शीतल तीवडे, पूजा साळोखे, पूजा भोर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
रॅली मार्ग पुढील प्रमाणे – गांधी मैदान – खरी कॉर्नर – बिनखांबी गणेश मंदिर पासून महाद्वार रोड – पापाची तिकटी – महानगरपालिका चौक – CPR चौक – दसरा चौक – बिंदू चौक – उमा टॉकीज – बागल चौक – राजारामपुरी जुनी पोलीस चौकी मार्गे – राजारामपुरी मारुती मंदिर – राजारामपुरी मेन रोड मार्गे – साईक्स एक्स्टेंशन येथे प्रचार कार्यालया ठिकाणी.


गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निघणार महायुतीची महारॅली!