बातम्या
गुलाब पाकळ्यांच्या चहाची वाढती क्रेझ, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्या !
By nisha patil - 7/3/2024 7:43:11 AM
Share This News:
ग्रीन टी आणि लेमन टी सध्या लोकप्रीय आहे. आता रोझ टी सुद्धा तेवढाच लोकप्रीय झाला आहे. रोझ टी गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार करण्यात येतो. या चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. गुलाबाच्या पाकळ्या सेवन केल्याने मेंदू मजबूत होतो. गुलाब चहाचे कोणते फायदे ते जाणून घेवूयात.
असा तयार करा
एक किंवा दोन गुलाबाची फूले घ्या. दोन कप पाणी गरम करा. या पाण्यात गुलाबाची फुले टाका. 10 मिनिटांनी हे पाणी गाळून कपात काढा. यात थोडे मध आणि थोडा लिंबाचा रस टाका. आता गुलाब चहा तयार झाला आहे.
हे आहेत फायदे
1 त्वचा आणखी तजेलदार आणि चमकदार दिसते.
2 शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात.
3 रोग प्रतिकारकशक्तीही वाढते.
4 थंडी वाजत असेल किंवा ताप आला असेल फायदा होतो.
5 वजन कमी होण्यास मदत होते.काय आहे यात
* पॉलिफेनोल अॅटी-ऑक्सिडेंट
* एंथोकायनिन
* एलागिक अॅसिड
* क्वरेटिन
गुलाब पाकळ्यांच्या चहाची वाढती क्रेझ, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्या !
|