30 एप्रिलला होणाऱ्या MPSC परीक्षेचं हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल

The hall ticket of the MPSC exam to be held on April 30 is viral on social media


By nisha patil -
Share This News:



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  30 एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची  टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये  व्हायरल होत आहे. या लिंकमध्ये 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट समोर आल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळत असल्याने डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे.
हा फक्त नमुना डेटा आहे, आमच्याकडे सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांची खालील माहिती देखील आहे. ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी फावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आणि बरेच काही. पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका 2023 देखील उपलब्ध आहे, असा दावा देखील या व्हायरल लिंकवर करण्यात आला आहे.एमपीएससीच्या परीक्षेचे हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक वायरल होत असल्याची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आली आहे. ही लिंक कशाप्रकारे जनरेट झाली? कोणी जनरेट केली? या संदर्भात एमपीएससी माहिती घेत आहे. शिवाय या लिंक संदर्भात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एमपीएससीकडून मिळाली आहे.


The hall ticket of the MPSC exam to be held on April 30 is viral on social media