बातम्या
आरोग्य विभागाने मोडला रेकॉर्ड तब्बल 13 लाख 96 हजार 72 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
By nisha patil - 7/18/2024 6:32:52 PM
Share This News:
विठुरायाच्या भेटीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाने यंदा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. आषाढी यात्रा काळात एकादशी पर्यंत 13 लाख 96 हजार 72 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण केली असून आरोग्य विभागाने आपलाच गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
आषाढी एकादशीनिमित्त यंदा पंढरपुरात भक्तीचा महासागर उसळला होता. लाखोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून पंढरपूरी आले होते. टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर विठ्ठल्लाच्या जयघोषात पंढरीच्या दिशेने चालणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी सरकारने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रम सुरु केला होता. या अंतर्गत भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यंदा या आरोग्य शिबिरात लाभ घेणाऱ्या भाविकांमध्ये विक्रमी वाढ झाली.
गेल्यावर्षी अतिशय नाजूक तब्येत असणाऱ्या दीड हजार पेक्षा जास्त भाविकांना वेळेवर म्हणजे गोल्डन अवर मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचवता आले होते. त्याच पद्धतीने यंदा अगदी मंदिरात आणि नामदेव पायरी येथेही अत्यावश्यक उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती.
आरोग्य विभागाने मोडला रेकॉर्ड तब्बल 13 लाख 96 हजार 72 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
|