बातम्या
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींची तब्येत बिघडली...
By nisha patil - 3/14/2024 12:41:33 PM
Share This News:
पुणे – भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडलीय. सध्या त्यांच्यावर पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्यांचे वय ८९ वर्ष असून त्यांनी २००७ ते २०१२ या कालवधीत देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून स्थान भूषवलय.
गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नव्हती. तसेच काल (बुधवारी) त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलय. कायदेतज्ज्ञ असलेल्या प्रतिभाताई जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. तसेच त्या एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षाही होत्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत २० वर्षे त्यांनी निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळलीयत.
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींची तब्येत बिघडली...
|