बातम्या
सभासद कल्याण ठेव योजना व विमा योजनेतून मयत सभासदांचे वारसांना रु. ५ लाख ६६ हजारचे सहाय्य
By nisha patil - 2/27/2024 4:02:18 PM
Share This News:
कोल्हापूर दि. 27 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण् संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेचे संस्थेचे सभासद गोसावी अशोक मारुती यांनी पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. त्यांनी सदर कर्ज प्रकरणावेळी सभासद कल्याण ठेव योजना व विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. त्यांचे दिनांक १४/१०/२०२३ ई रोजी आकस्मित निधन झाले, त्यामुळे संस्थेच्या कल्याण ठेव योजनेमधून रुपये दोन लाख व विमा योजनेतून रुपये दहा लाख इतके अर्थसहाय्य उपलब्ध झाले. सदर रक्कमेतून संस्थेकडील येणे कर्जबाकी जमा करून उर्वरित रक्कम रुपये ५ लाख ६६ हजार इतकी रक्कम त्यांचे वारस सौरभ अशोक गोसावी यांना मुरलीधर गावडे , विकास अधिकारी, भारतीय आयुर्विमा महामंडळ, यांच्या हस्ते अदा करण्यात आली. सदर समयी पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे,. बाळासाहेब नारे, सभासद व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
गावडे साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या या योजनेबाबत समाधान व्यक्त केले व वारसांना उपलब्ध होत असलेल्या योजना साह्याबाबत कौतुक केले. सदर वेळी संबंधित मयत कर्जदाराचे वारस यांनी मिळालेल्या साह्याबद्दल संस्थेप्रती आभार मानले व या योजनेमध्ये जास्तीत जास्त सभासदांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
सभासद कल्याण ठेव योजना व विमा योजनेतून मयत सभासदांचे वारसांना रु. ५ लाख ६६ हजारचे सहाय्य
|