iQOO Neo 7 Pro स्मार्टफोन पुढील महिन्यात होणार लाँच, फोनमध्ये मिळणार भन्नाट फीचर्ससह गेमिंग चिप
By nisha patil - 6/30/2023 5:40:40 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम आयक्यूने भन्नाट स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक भन्नाट फीचर्ससह एक स्वतंत्र गेमिंग चिपही मिळणार आहे. यामुळे हा स्मार्टफोन गेमिंगची आवड असणाऱ्या युजर्सच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा आहे. या स्मार्टफोनची माहिती नुकतीच लीक झाली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, IQOO Neo 7 Pro हा स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच होऊ शकतो. पण हा फोन लाँच करण्याआधीच शॉपिंग वेबसाईट ॲमेझॉनकडून IQOO Neo 7 Pro 5G ची किंमत जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने 'ॲमेझॉन प्राईम डे सेल'च्या बॅनरखाली चुकून ही किंमत उघड केल्याचं समोर आलं आहे. या लीक झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोन अनेक भन्नाट फीचर्स मिळणार आहेत. कंपनीने हा स्मार्टफोन विक्रीसाठी ॲमेझॉनवर उपलब्ध करुन दिला आहे. या फोनची किंमत 33,999 रुपये इतकी असून 4 जुलै रोजी लाँच होऊ शकतो.या स्मार्टफोनची किंमत ॲमेझॉनने चुकून जाहीर केली आहे. यामुळे फोनची खरी किंमत लाँचिंगच्या दिवशीच समजू शकते. सध्या तरी हे स्पष्ट नाही की, ॲमेझॉनवर जाहीर करण्यात आलेली किंमत ऑफरच्या आधीची आहे की कोणत्याही ऑफर्सशिवाय आहे. टिपस्टर योगेश बरार यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी हा फोन 35 ते 36 हजार रुपये किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे.
iQOO Neo 7 Pro स्मार्टफोन पुढील महिन्यात होणार लाँच, फोनमध्ये मिळणार भन्नाट फीचर्ससह गेमिंग चिप
|