बातम्या

नवदांपत्याचे आदर्शवादी पाऊल

The idealistic step of the newlyweds


By nisha patil - 3/27/2024 7:13:01 PM
Share This News:



नवदांपत्याचे आदर्शवादी पाऊल

लग्नातील अवास्तव खर्चाला फाटा देत रचला सत्कार्याचा पायंडा

कोल्हापूर: कृष्णात आनंदा जगताप यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात लग्नातील अवास्तव खर्चाला फाटा देत एक नवीन आदर्श घालून दिला. स्वामी विवेकानंद अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सावर्डे दुमालास 5000 रू देणगी स्वरुपात भेट देऊन एक आदर्शवत पायंडा निर्माण केला. कृष्णात व स्वाती यांच्या वैवाहिक जीवनासाठी स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या दाम्पत्याने उचललेले सत्कार्याचे पाऊल  निश्चितच इतरांना आपल्या अभ्यासिकेविषयी कृतज्ञ होण्याची प्रेरणा देईल.


नवदांपत्याचे आदर्शवादी पाऊल