बातम्या
काळानुरूप तुकारामांची चित्रप्रतिमा बदलत गेली - भास्कर हांडे
By Administrator - 1/17/2024 1:58:32 PM
Share This News:
कोल्हापूर : तुकारामांची चित्रप्रतिमा काळानुरूप बदलत गेली असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे चित्रकार भास्कर हांडे यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने आयोजित संत तुकारामांची वास्तविक चित्रप्रतिमा या विषयावर प्रमुख वक्ते म्हणूनबोलत होते. आपल्या व्याख्यानामध्ये ते म्हणाले की, तुकारामाच्या वेगवेगळ्या काळातील चित्रप्रतिमांच्यावर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक घटनांचा परिणाम झालेला दिसून येतो. वेगवेगळया काळातील लोकमानसाच्या मनात असणा–या तुकारामांच्या चित्रप्रतिमा त्या त्या काळातील कलावंतांनी निर्माण केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रणधीर शिंदे म्हणाले की, संत तुकाराम यांच्या चित्रप्रतिमेला
बहुअयामी असे अनेक पदर आहेत. त्यामुळे तुकारांमाची चित्रप्रतिमा वेगवेगळी दिसते. यासाठी मुळापर्यंत जाऊन विचार केला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. आभार डॉ. सुखदेव एकल तर सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. प्रभंजन माने, डॉ. राजशेखर शिंदे, मा. गोरख थोरात तसेच विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापक, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विभागातील संशोधक विद्यार्थी, एम.ए.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
काळानुरूप तुकारामांची चित्रप्रतिमा बदलत गेली- भास्कर हांडे
|