बातम्या
आरंभ बालक पालक मेळावा तिरवडे या ठिकाणी संपन्न .
By nisha patil - 3/18/2025 5:55:26 PM
Share This News:
आरंभ बालक पालक मेळावा तिरवडे या ठिकाणी संपन्न .
आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन तिरवडे या ठिकाणी करण्यात आले होते. या उपक्रमातून झिरो ते तीन वयोगटातील बालकांच्या पालकांना जागृत करणे, पालकांचा बालकाशी खेळ कृती संवाद वाढविणे, बालकांना कृतियुक्त खेळाद्वारे मार्गदर्शन करून त्याच्या वाढीचे निकष कसा साधावा ? यांचे मार्गदर्शन करण्यात आले .या मेळाव्यातील विविध माहितीपर कृतीयुक्त स्टॉल वरील माहिती सुंदर होती .
त्यामुळे महिलांचे मन भारावून गेले होते. भविष्याचे झाड, गरोदरपणातील संवाद, मेंदूची वाढ विरुद्ध, शरीराची वाढ तसेच वयोगटांनुसार शून्य ते तीन वर्ष वयोगटातील खेळ व कृती मायेचा घास, गोष्टी सांगणे, आरशातील प्रतिबिंब, आहार प्रकार, संवेदनशील पालक तत्व, बाळ कोपरा, विकासाची साप शिडी, इत्यादी स्टॉल वरील माहिती उत्कृष्ट पद्धतीची होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती यशवंत उर्फ बाबा नांदेकर, विश्वजीतराव जाधव, दत्तात्रय भेंडवडेकर ,नामदेव पाटील , केशव गोजारे ,सरपंच शुभांगी ताई जाधव, सरपंच सिद्धी माडगूत, ग्रामसेवक रूपाली पाटील ,अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रणिता दीक्षित, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुमन कांबळे तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी , अंगणवाडी शिक्षिका, महिला बालक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तारा न्यूज साठी कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंजळेकर
आरंभ बालक पालक मेळावा तिरवडे या ठिकाणी संपन्न .
|