बातम्या

कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजीच्या नवीन वास्तूचे उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला

The inauguration ceremony of the new building of Kusum Olympiad


By nisha patil - 10/1/2025 8:57:51 PM
Share This News:



सौ. कुसुमताई बाल व प्राथमिक विद्या मंदिर, इचलकरंजी आणि मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या अंतर्गत उभारलेल्या कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी या नवीन वास्तूचे उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. 

हा समारंभ माननीय आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या शुभहस्ते व संस्थेचे संस्थापक सुधाकरराव मणेरे मामा आणि सौ. मोश्मी आवाडे वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

कार्यक्रमास कबनूरच्या सरपंच सौ. सुलोचना कट्टी, आदिनाथ बँकेचे चेअरमन सुभाष कडप्पा, शांतिनाथ पतसंस्थेचे चेअरमन मिलिंद कोले, माजी सरपंच मधुकर मणेरे, माजी सरपंच प्रदीप मणेरे, माजी उपसरपंच निलेश पाटील, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, ट्रस्टी उपाध्यक्ष सुभाष केटकाळे, ट्रस्टी शीतलकुमार मणेरे, अनिल कुमार मणेरे, संमान मणेरे, ज्योती मणेरे, साक्षी मणेरे, शाल्वी मणेरे, प्राचार्या मंगसुळे मॅडम, समन्वयक आणि प्राथमिक मुख्याध्यापक ऐनापुरे मॅडम, तसेच नितेश पोवार, बंडा मुळीक यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन वास्तूच्या उद्घाटनानिमित्त मान्यवरांनी या प्रकल्पाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कुसुम ऑलिम्पियाड हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.


कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजीच्या नवीन वास्तूचे उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला
Total Views: 52