बातम्या
शिवकल्याणी राजयोग सभागृहाचे उद्घाटन उत्साहात संपन्न
By nisha patil - 2/19/2025 9:53:08 PM
Share This News:
शिवकल्याणी राजयोग सभागृहाचे उद्घाटन उत्साहात संपन्न
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे शिवकल्याणी राजयोग सभागृहाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या समारंभाला माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी राजयोग आणि ध्यानधारणेचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी यावेळी सांगितले की, "शिवकल्याणी राजयोग सभागृह हे आध्यात्मिक व सामाजिक उन्नतीसाठी उत्तम व्यासपीठ ठरेल. येथे नव्या पिढीला संस्कार व योगसाधनेसाठी मार्गदर्शन मिळेल."
समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी ब्रह्माकुमारी आशा दीदीजी, पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील, उपसभापती शालिनी पाटील, चंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहल कांबळे व इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला स्थानिक नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवकल्याणी राजयोग सभागृहाचे उद्घाटन उत्साहात संपन्न
|