बातम्या

शिवछत्रपतींनी उभा केलेल्या स्वराज्यात त्यांचाच पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी....डॉ. सुजित मिणचेकर

The incident of the collapse of Shiv Chhatrapatis own statue in Swarajya is very unfortunate


By nisha patil - 1/9/2024 7:21:39 PM
Share This News:



ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्य उभं केलं, आज त्याच स्वराज्यात त्यांचाच पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी असून महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणारी आहे. या निंदनीय घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, त्यामुळे या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्वच आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर ( संचालक- गोकुळ दूध संघ, कोल्हापूर ) यांनी केली ते हातकलंगले येथे आयोजित मालवण मधील किल्ले श्रीराजकोट येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ बोलत होते.            
       

यावेळी निषेध आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, मा.जि.प.सभापती प्रवीण यादव, उपतालुकाप्रमुख बाबासाहेब शिंगे, उपतालुकाप्रमुख राजूदादा पाटील, हातकणंगले शहरप्रमुख धोंडीराम कोरवी, मा.पं.स. सदस्य पिंटू मुरूमकर, संभाजी हांडे, अमोल देशपांडे, संजय लोहार, अविनाश शिंदे, उदय शिंदे, संदीप दबडे, अंकुश माने, सुनील माने, विनायक शेंडगे, अर्जुन यादव, सयाजी कांबळे, नितीन पवार, भानूदास पाटील, दीपक कोळी, शरद पवार, काका पाटील, विनायक कोठावळे, स्वप्नील सरोदे, अविनाश शिंदे, अमर पाटील, श्रीकांत निकम, रजनीकांत माने, सुधीर कांबळे, प्रवीण माने, गणेश पाटील, बंटी चोकाककर, विशाल साजणीकर, अमर आठवले, प्रियदर्शन पाटील, रमेश कांबळे, रवींद्र कांबळे, विष्णू पाटील, प्रशांत नरंदेकर, जालिंदर जाधव, सुनील वड्ड, अनिकेत पांडव, संतोष सूर्यवंशी, अक्षय लोंढे, विशाल तेली, संस्कार पाटील, अर्जुन जाधव, सचिन चौगुले, सचिन थोरवत, अंकुश सूर्यवंशी, अभिजीत रानोजी, संतोष भोसले, अरुण घाडगे, मनोज शिंदे, सुभाष माने, राजू दरवेशी, पियुष शिरोलीकर, संतोष शिंगाडे, सिद्धार्थ माने व इतर पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक तसेच इतर अंगीकृत व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवछत्रपतींनी उभा केलेल्या स्वराज्यात त्यांचाच पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी....डॉ. सुजित मिणचेकर