बातम्या

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा बेमुदत संप चालूच राहणार- कॉम्रेड आप्पा पाटील

The indefinite strike of Anganwadi workers and helpers will continue  Comrade Appa Patil


By nisha patil - 12/16/2023 5:07:51 PM
Share This News:



कोल्हापूर- अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना किमान वेतन म्हणून सेवकांना 26000/- व मदतनीस यांना 20000/- रुपये मानधन मिळावे या मागणीसाठी 4 डिसेंबर पासून राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर आहेत. यापूर्वी अनेक आंदोलने केल्यानंतर 15 डिसेंबर रोजी  नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने याठिकाणी प्रचंड महामोर्चा काढण्यात आला. यावेळी संपूर्ण राज्यातून हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. 
 

यादरम्यान अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने महिला व बालविकास मंत्री मा.आदिती तटकरे यांना शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. मात्र यावेळी मंत्री महोदय यांनी हा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करणार असून त्यावेळी निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. व कोणताही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे कृती समितीच्या वतीने हा संप सुरू ठेवण्याची घोषणा केली.  
 

यावेळी भेटलेल्या शिष्टमंडळात कॉम्रेड शुभा शमीम, कॉम्रेड आप्पा पाटील, भगवानराव देशमुख  ,नीलेश दातखीळ, दिलीप उटणे,निशा.शिवरकर, सुवर्णा तळेकर यांचा समावेश होता.  मोर्चात कोल्हापूर जिल्हय़ातून सुमारे 500 सेविका मदतनीस सहभागी झाल्या होत्या. 
कॉम्रेड आप्पा पाटील


अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा बेमुदत संप चालूच राहणार- कॉम्रेड आप्पा पाटील