विशेष बातम्या

वंदूर मध्ये आरंभ बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न 

The initial child parent meeting in Vandoor was full of enthusiasm


By nisha patil - 1/3/2025 8:51:01 PM
Share This News:



वंदूर मध्ये आरंभ बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न 

वंदूर :वार्ताहर  गर्भधारणेपासून ते तीन वर्षापर्यंत पाल्यावर केलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडतात. खेळ, कृती आणि संवाद या त्रिसूत्रीवर जास्तीत जास्त भर दिल्यास बुद्ध्यांक वाढवण्यास मदत होते, मातेच्या गर्भावस्थेपासून जन्मापर्यंत बाळाच्या मेंदूचा विकास 30 टक्के होतो तर तीन वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूचा विकास 80 टक्के होतो, मुलांशी नेहमी सकारात्मक संवाद साधण्यास संस्कार पिढी निर्माण होईल असं मत अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना चव्हाण यांनी व्यक्त केलं. विद्यामंदिर वंदूर येथे आयोजित आरंभ बालक पालक मेळावा प्रसंगी चव्हाण बोलत होत्या. 

कार्यक्रमाला वंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंच धनश्रीदेवी घाटगे उपसरपंच शिवाजी बागणे, ग्रामसेवक एस एस चौगुले, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पाटील, धनराज घाटगे, आरोग्य विभागातील कर्मचारी, विद्या मंदिर वंदूर शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.


वंदूर मध्ये आरंभ बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न 
Total Views: 41