बातम्या
पावसाचा जोर वाढला कोयना धरणातून पुन्हा विसर्ग सुरू
By nisha patil - 6/27/2023 4:59:28 PM
Share This News:
कोयनानगर : कोयना धरणाच्या पायथा वीजगृह सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दोन जनित्रातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे.गत चार दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस जोर वाढत आहे. यामुळे धरणाच्या पाणीपातळी वाढ होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा १०.९५ टीएमसी इतका झाला आहे. बुधवार, दि. २१ रोजी पाणी आवर्तन संपल्याने कोयना धरणातून पूर्ण विसर्ग बंद करण्यात आला होता. सोमवारी सकाळी पुन्हा धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोन जनित्र सुरू करत २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी झालेल्या पडलेल्या व कंसात आतापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे : कोयना ५६/२३६, नवजा ५६/२६६, महाबळेश्वर ९४/३६८ मिलीमीटर.
पावसाचा जोर वाढला कोयना धरणातून पुन्हा विसर्ग सुरू
|