बातम्या

इचलकरंजी न्यायसंकुलाचा प्रश्न मार्गी लागला; आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचा सत्कार

The issue of the Ichalkaranji Judiciary was resolved


By nisha patil - 8/26/2024 10:14:26 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्या मुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इचलकरंजी न्यायसंकुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. प्रस्तावित जागेवरील आरक्षण उठविण्याचा निर्णय घेऊन सदरची जागा न्याय संकुलासाठी देण्यावर कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. याबद्दल इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अॅड राम मुदगल, अॅड स्वानंद कुलकर्णी, प्रकाश मोरे, रणजित जाधव,अध्यक्ष अॅड. शिवराज चुडमूंगे, सेक्रेटरी अॅड. आर. व्ही. शिंगे, माजी उपाध्यक्ष अॅड. विवेक तांबे, माजी सेक्रेटरी अॅड. विशाल जाधव, अॅड. अल्ताफ मुजावर, अध्यक्ष अॅड. मेहबुब बाणदार, उपाध्यक्ष अॅड. अमित सिंग,  अॅड. अतुल रेंदाळे, अॅड. निलेश लकडे, अॅड. अनुराग कुलकर्णी, अॅड. सुधीर मस्के, अॅड. निता परीट, अॅड. अभिजीत माने, अॅड. सुनिल भोसले, अॅड. विजय शिंगारे, अॅड. आर. आर. तोष्णीवाल, अॅड. जावेद बैरागदार, अॅड. आप्पासाहेब इरसाले उपस्थित होते.


इचलकरंजी न्यायसंकुलाचा प्रश्न मार्गी लागला; आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचा सत्कार